शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूर रोड-वडगाव येथे राहणाऱया किटवाड (ता. चंदगड) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. गजानन नारायण कसलकर (वय 21) असे त्या तरुणाचे नाव आहे. तो हॉटेलमध्ये वेटर काम करत होता. मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून गजानन कसलकर हा येळ्ळूर-वडगाव रोडवर एका भाडय़ाच्या खोलीमध्ये राहत होता. त्याला सरकारी नोकरी हवी होती. मात्र ती नोकरी मिळाली नाही म्हणून तो तणावाखाली होता. त्याने राहणाऱया खोलीतील स्लॅपच्या हुक्काला बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या प्रकरणी त्याचा भाऊ लक्ष्मण कसलकर याने शहापूर पोलीस स्थानकात फिर्यादीत दिली आहे. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केंला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविला आहे. तेथे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.