चौघा जणांना अटक : 16 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
भारतनगर, शहापूर येथे अंदर-बाहर जुगार खेळणाऱया चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याजवळून 16 हजार 250 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
भारतनगर, शहापूर परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून चौघा जणांना अटक केली. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 1963 च्या कलम 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.