प्रतिनिधी/ बेळगाव :
शहापूर लक्ष्मीरोड येथील महा गणपती युवक मंडळ व साहेब फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डेंग्यू प्रतिबंधक औषध वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके उपस्थित होते.
शहरात सर्वत्र डेंग्यूचा फैलाव वाढत असल्यामुळे प्रतिबंधक औषधाचे वितरण करण्यात येत आहे. या काळात नागरिकांनी कशा प्रकारे खबरदारी घ्यावी या विषयी या कार्यक्रमात माहिती देण्यात आली. यावेळी किरण हुद्दार, महापालिका स्वच्छता निरीक्षक शाम चौगुले, उमेश माने, सचिन केळवेकर, दीपक सावळेकर, अध्यक्ष सुंदर केळवेकर, गौतम वेर्णेकर, रितेश पाटील, विनायक नांदवडेकर, शेखर तारिहाळकर, मेघन तारिहाळकर उपस्थित होते.