प्रतिनिधी/ बेळगाव
पारंपरिक पद्धतीने रविवारी बेळगाव शहर व उपनगरांमध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्त लक्ष्मी पूजनाची धूम पाहायला मिळाली. वडगाव, शहापूर, खासबाग, जुनेबेळगाव, अनगोळ परिसरात मोठय़ा उत्साहपूर्ण वातावरणात लक्ष्मीपूजन करण्यात आले. सकाळपासूनच लक्ष्मी पूजनाची धामधूम पहायला मिळत होती. फुलांच्या सजावट, दुकांनासमोर मोठमोठय़ा घालण्यात आलेल्या रांगोळय़ा, विद्युत रोषणाईचा लखलखाट असे चित्र बाजारात दिसत होते.
यावषी कोरोनाचे सावट असले तरी व्यापाऱयांनी श्रद्धापूर्ण वातावरणात लक्ष्मीचे पूजन केले. पुढील वर्षभरामध्ये व्यवसायाची भरभराट होवो व कोरोनाचे संकट लवकर दूर होवो. यासाठीची मागणी लक्ष्मी देवीकडे करण्यात आली. लक्ष्मी पूजनासाठी रविवारी सकाळपासूनच लगबग सुरू होती. यासाठी मोठय़ा प्रमाणात बाजारात झेंडू, शेवंती या फुलांची मोठी आवक होती. यासोबत ऊस व पूजेचे इतर साहित्य खरेदी करण्यास रविवारी सकाळी गर्दी झाली होती.
पारंपरिक पद्धतीने शहराच्या उपनगरांमध्ये लक्ष्मी पुजन करण्यात आले. यामुळे शहापूरचे खडेबाजार गर्दीने फुलले होते. सर्वत्र लक्ष्मी पुजनाची धामधूम असल्यामुळे काही प्रमाणात ट्रफिक जामची समस्या जाणवली. मागील वषीच्या तुलनेत या वषी कमी प्रमाणात फटाक्मयांची आतषबाजी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत लक्ष्मी पूजनाची धामधूम सुरू होती.
ऐन लक्ष्मी पूजनात विजेचा लपंडाव
रविवारी शहर तसेच उपनगरांमध्ये लक्ष्मी पूजनाची धामधूम सुरू होती. त्यातच सायंकाळी 7 नंतर विजेचा लपंडाव सुरू झाला. ऐन लक्ष्मी पूजनाच्या धार्मिक विधीवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यापाऱयांचा हिरमोड झाला. निदान लक्ष्मी पूजनावेळी तरी वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे असताना हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार होत असल्याची तक्रार नागरिक करीत होते.