रंगांनी दुकाने सजली, युवावर्गाकडून पार्ट्यांचे नियोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर, वडगावसह ग्रामीण भागात रविवार दि. 12 रोजी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. रंगांच्या उधळणीसाठी युवावर्गाकडून ठिकठिकाणी रेनडान्सचे आयोजन करण्यात आले आहे. साप्ताहिक सुटी आल्याने यावषी रंगोत्सवाला अधिकच भर चढेल, असा विश्वास तऊणांना असल्याने डिजे लावण्याची तयारी केली जात आहे.
संस्थान काळापासून शहापूर, वडगावसह ग्रामीण भागात होळीच्या पाचव्या दिवशी पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जाते. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी होत असली तरी ग्रामीण भागात मात्र आजही पारंपरिक पद्धतीनेच रंगोत्सवाचे आयोजन केले जाते. रंगोत्सवासाठी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगांची आवक झाली असून खरेदीसाठी गर्दी होत आहे.
परीक्षांचा कालावधी असला तरी साप्ताहिक सुटी आल्याने रंगपंचमीचा आनंद लुटण्याची तयारी तऊणाईकडून सुरू आहे. शहापूर व वडगाव भागात काही ठिकाणी शॉवर व डीजे लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारपर्यंत रंगोत्सव संपविण्याचे आवाहन पोलिसांकडून युवावर्गाला करण्यात आले आहे.
शिवारामध्ये रंगणार पार्ट्या
रंगपंचमी व विकेंड जोडून आल्याने अनेकांनी पार्ट्यांचे नियोजन केले आहे. शिवारामध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. वडगाव, येळ्ळूर, मजगाव, अनगोळ, खादरवाडी, मंडोळी, जुने बेळगाव शिवारामध्ये पार्ट्यांसाठी शनिवारी संध्याकाळपासूनच तयारी केली जात होती. मांसाहारी व शाकाहारी लोकांसाठीच्या साहित्याची जमवाजमव केली जात होती.