प्रतिनिधी / बेळगाव
आचार्य गल्ली, गाडेमार्ग शहापूर येथील श्रीराम मंदिरात हरिनाम सप्ताह नुकताच पार पडला. यावेळी मंदिरात जय जय राम कृष्ण हरि, राम नाम जप, ओम नमः शिवाय हा जपदेखील करण्यात आला. यावेळी भक्तांनी सहभागी होऊन कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना केली.
सायंकाळी हभप रमाकांत महादेव उंडाळे यांचे प्रवचन झाले. यावेळी हभप मनोहर अंकले यांच्या हस्ते हार व श्रीफळ देऊन उंडाळे यांचा सत्कार करण्यात आला. पाटील गल्ली, खासबाग येथील सांप्रदायिक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम रात्री झाला. यावेळी हभप लक्ष्मण बन्नार, हभप लव महाराज नार्वेकर, बाळू पाटील, ज्ञानेश्वर काकडे, कुश नार्वेकर, परशराम मिरजकर, बाळकृष्ण नार्वेकर, वैजनाथ उचुलकर, क्रांती महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा भेकणे उपस्थित होते.