वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावचे सुपुत्र व शहीद जवान निंगाप्पा लक्ष्मण चिखलकर यांची 33 वी पुण्यतिथी येथील हुतात्मा चौकामध्ये रविवारी ग्रामस्थांच्यावतीने साजरी करण्यात आली.
यावेळी शहीद जवान निंगाप्पा चिखलकर, अमर रहे, भारत माता की जय, अशा घोषणा देऊन निंगाप्पा यांच्या आठवणींना उजाळा दिला. निंगाप्पा चिखलकर हे भारतीय सेनेमध्ये सेवा बजावत असताना 29 नोव्हेंबर 1987 रोजी त्यांना आफ्रिका येथे सेवा बाजवत असता अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आले. तेव्हापासून गेली 33 वर्षे कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांतर्फे त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते.
यावेळी ग्रा. पं. माजी अध्यक्ष दत्ता पाटील यांच्या हस्ते निंगाप्पा चिखलकर यांच्या स्मारकाचे पूजन केले. जवान चिखलकरांचे ज्येष्ठ बंधू सुभाष चिखलकर यांनी श्रीफळ वाढविला.
यावेळी ग्रा. पं. माजी सदस्य जयराम पाटील, अनिल पावशे, दादासाहेब भदरगडे, अरुण कोवी, निवृत्त जवान रामा तारिहाळकर, नारायण पाटील, नितीन पवार, किरण तारिहाळकर, पत्रकार सदानंद चव्हाण, माजी ग्रा. पं. अध्यक्ष गजानन पाटील आदींनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेकांनी निंगाप्पा चिखलकर यांच्या शौर्याबद्दल विचार मांडले.
ग्रा. पं. कार्यालयामध्ये श्रद्धांजली
निंगाप्पा चिखलकर यांची 33 वी पुण्यतिथी ग्राम पंचायत कार्यालयामध्येही साजरी करण्यात आली. यावेळी ग्रा. पं. माजी अध्यक्ष दत्ता पाटील यांच्याहस्ते फोटो पूजन केले. माजी सदस्य जयराम पाटील यांनी श्रीफळ वाढविले. दोन्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी केले.
यावेळी मल्लाप्पा पाटील, गोपाळ ग. पाटील, गोपाळ मा. पाटील, तानाजी पाटील, मयुर बसरीकट्टी, आनंद चिखलकर, शंकर चिखलकर, मुरलीधर चिखलकर, किसन चिखलकर, नागराज चिखलकर, भूषण चिखलकर, रोशन चिखलकर, महांतेश चिखलकर, हभप भैरु पाटील, हभप राजाराम पाच्छापुरे, भाऊ पावशे, तुळशीराम कोनेरी, धाकलू कागणकर, मल्लाप्पा अष्टेकर, बाळु कोनेरी, महेश कोवी, शंकर पाटील, रवी चव्हाण, तलाठीचे सहाय्यक बाळू पाटील, शंकर पाटीलसह ग्रामस्थ उपस्थित होते.