ऑनलाईन टीम / भोपाळ :
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात सीमावादावरून सोमवारी रात्री आणि मंगळवारी चिनी सैन्याने लोखंडी सळई, काटेरी तारेचा वेढा असलेल्या काठ्या आणि दगडाने भारतीय जवानांवर हल्ला केला.
या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यामध्ये मध्य प्रदेश राज्यातील दीपक कुमार यांचा देखील समावेश आहे. पूर्व लडाखच्या खोऱ्यात तैनात नायक दीपक कुमार यांनी देशाची सेवा करत असताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
राज्याच्या शिवराज सरकारने शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण करत त्याच्या परिवारास आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, नायक दीपक कुमार यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची सन्मानिय मदत, एका सदस्यास सरकारी नोकरी आणि एखादे घर किंवा फ्लॅट कुटुंबीयांशी चर्चा करून देण्यात येणार आहे. असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.