बार्शी /प्रतिनिधी
जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दल आणि अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत बार्शी तालुक्यातील पानगाव या गावचे सुपुत्र सुनील काळे यांना वीरमरण आले होते. आज या शहीद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख हे आले होते. यावेळी महाराष्ट्र सरकारतर्फे या शहीद जवानाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या मंत्रीमहोदयांनी या कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच यावेळी शहीद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबियांना शासन सर्वतोपरी मदत करेल आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी या मंत्रीमहोदय बरोबर पालकमंत्री दत्तात्रय भरणे ,संजय मामा शिंदे ,बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत ,माजी मंत्री व माजी आमदार दिलीप सोपल शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर व इतर राजकिय नेते, अधिकारी उपस्थित होते.
शहीद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना या मंत्रीमहोदयांनी सांगितले की , आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आलो होतो यावेळी त्या कुटुंबाच्या अडचणी जाणून घेतल्या. जवान काळे यांचे कुटुंब गरिबीत आहे या कुटुंबाच्या पाठीशी राहण्याचा आम्ही संकल्प केला असून या कुटुंबाला कोणतीही अडचण येणार नाही याची शासन पुरेपुर काळजी घेईल आणि पुढे बोलताना त्यांनी सांगितले की या कुटुंबाला नियमाप्रमाणे सुरक्षा दलाची आणि शासनाची मदत मिळेल मात्र आज या कुटुंबाशी चर्चा करताना जाणवले की या कुटुंबाला एक शाश्वत आर्थिक स्त्रोत देण्याची गरज आहे. आणि त्या कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर त्यांना एक शासकीय नोकरी त्यांच्या कुटुंबातील एकाला देण्याचा महाराष्ट्र शासन विचार करत आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने त्या कुटुंबाला हातभार म्हणून काही आर्थिक पाठबळही देण्याचा विचार आम्ही केला आहे. त्याप्रमाणे लवकरच निर्णय होऊन या कुटुंबाच्या दुःखात सर्वतोपरी आहि राहू असे आश्वासन आज आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
माजी मंत्री सोपर यांच्या घरी सदिच्छा भेट
आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री बार्शी तालुक्यातील पानगाव या गावचे सुपुत्र जम्मू काश्मीर या ठिकाणी अतिरेकी यांच्याशी लढताना शहीद झाले होते. शहीद जवान काळे या कुटुंबाच्या घरी आहे मंत्रीमहोदय आले असताना बार्शीतील माजी आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या घरी या मंत्रिमहोदयांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी संजय मामा शिंदे पालकमंत्री दत्तात्रय भरणे बार्शी नगर परिषद विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे माजी नगराध्यक्ष योगेश सोपल आर्यन सोपल तसेच बाळासाहेब तातेड व इतर मान्यवर उपस्थित होते.