शांघाय
चीनमधील शांघायमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. शासनाने या संदर्भात खबरदारी घेतली असून काही ठिकाणी कडक निर्बंध जारी केले आहेत. शुक्रवारी एका दिवसामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये साठ टक्के इतकी वाढ दिसून आली. शांघाय शहरात 1609 रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची वाढतीसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने तेथे कठोर निर्बंधांचा अवलंब करण्यास प्रारंभ केला आहे. विविध ठिकाणी निर्बंध घालण्यात आल्याने सामान्यांना खाद्यपदार्थ मिळवणे मुश्कील बनते आहे. चीनमध्ये शुक्रवारी एकंदर 4 हजार 790 रुग्ण आढळून आले आहेत. यात 3 हजार 489 रुग्णांमध्ये लक्षणे आढळलेली नाहीत. वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर चाचणीवर शासनाने वेग दिला आहे व आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. प्रशासनाने आता मास्कची सक्ती पुन्हा लागू केली आहे.