ऑनलाईन टीम / ओस्लो :
यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार फिलीपाईन्सनमधील मारिया रेस्सा आणि रशियातील दिमित्री मुरातोव्ह या दोन पत्रकारांना जाहीर झाला आहे. भाषणस्वातंत्र्य ही लोकशाहीची पहिली अट असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण केल्याबद्दल या दोघांनाही नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.
शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीला तब्बल 10 मिलियन स्वीडिश क्रोना म्हणजेच जवळपास आठ कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.