प्रतिनिधी /बेळगाव
शांताई वृद्धाश्रमात सोमवारी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. परिसरातील कारखान्यातील कर्मचारी तसेच गावातील नागरिकांनी लसीचा लाभ घेतला.
कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांचे सुपूत्र एलन विजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त या लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी अशोक कोरी, ज्युनिअर हेल्थ असिस्टंट शशिकला शिर्के, हेल्थ ऑफिसर प्रदीप कापशे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर झाले. शांताई वृद्धाश्रमातील आजी, आजोबा तसेच बामणवाडी परिसरातील नागरिकांना योग्य वेळेत लस उपलब्ध व्हावी हा उद्देश ठेवण्यात आला होता. राजेश वेरणेकर, नागेश चौगुले मारिया मोरे, शुंभू शिंत्रे, शरल मोरे, राजु पाटील, महादेव पाटील यांनी परिश्रम घेतले.