प्रतिनिधी / बेळगाव
विविध प्रकारच्या व्याधींवर नव्यानेच तिबेटीयन साऊंड थेरपी उपचार पद्धत उपयुक्त ठरत आहे. याच हेतुने शांताई वृद्धाश्रमात तिबेटीयन उपचार पद्धतीचा उद्घाटन समारंभ सोमवारी सकाळी पार पडला. शांताई पाटील यांच्या हस्ते या उपचार पद्धतीचे उद्घाटन करण्यात आले.
वृद्धाश्रमाच्या परिसरात नरेंद्र पाटील यांच्यातर्फे दररोज सायंकाळी सदर उपचार पद्धतीचे आयोजन केले जाणार आहे. आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे, वसंत बालिगा व व्यवस्थापक नागेश चौगुले यांनी या उपचार पद्धतीमुळे होणाऱया फायद्याची माहिती दिली. ऋषिकेश आणि गोवा येथील तज्ञ हा उपचार करणार आहेत.
याप्रसंगी आश्रमाच्या संचालिका गंगा पाटील, विकी पाटील, मोहम्मद कुन्नीभावी, संतोष ममदापूर, रेखा बाळेकुंद्री, वृद्धाश्रमाचे सदस्य, निमंत्रीत आणि हितचिंतक उपस्थित होते. ऍलन मोरे यांनी सर्वांचे आभार मानले. याबाबत अधिक माहितीसाठी नागेंद्र पाटील मो. 8692434748 यावर संपर्क साधावा, असे कळविले आहे.