प्रतिनिधी/ बेळगाव
जायंट्स मेनच्या माध्यमातून बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमात भक्तिगीतांचा भजनसंध्या कार्यक्रम आयोजित केला होता. खास दीपावलीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रंगलेल्या दीपावली भजनसंध्या संगीत कार्यक्रमात बहारदार भक्तिगीतांचे सादरीकरण झाले. कुटुंबापासून दूर असलेल्या ज्ये÷ांना दिवाळीनिमित्तचे हे कौतुक डोळय़ांत आनंदाश्रू देऊन गेले.
बेटगेरी येथील सातेरी भजनी मंडळाने याचे सादरीकरण केले. कुटुंबापासून दुरावलेल्या ज्ये÷ नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी जायंट्स मेनने दीपावली भजनसंध्या संगीत मैफल रंगवली. या निमित्ताने ज्ये÷ांना उसाचा रस आणि आलीपाक चिरमुरे खाऊ देण्यात आले. तत्पूर्वी सुरुवातीला कार्यक्रमाचे उद्घाटन शांताईचे संचालक संतोष ममदापूर, जायंट्सचे अध्यक्ष संजय पाटील, स्पे कमिटी सदस्य मोहन कारेकर, कार्याध्यक्ष विजय मोरे, फेडरेशन सहाचे अध्यक्ष अनंत जांगळे, युनिट संचालक मदन बामणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
शांताई वृद्धाश्रमात सेवा बजावणाऱया बाळव्वा मुलीमनी, वज्रा हुडेद, रेखा कणबरकर आणि मलप्रभा दिंडीगीती यांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जायंट्सचे पदाधिकारी, सदस्य, सर्व आजी आजोबा, शांताईचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.