प्रतिनिधी /कुंकळ्ळी
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानचा गेले चार दिवस सुरू असलेला वार्षिक जत्रोत्सव मोठय़ा धूमधडाक्मयात साजरा झाला. भाविकांसाठी सर्व दृष्टीने योग्य अशी व्यवस्था ठेवण्याच्या बाबतीत संस्थान समितीने चोख कामगिरी बजावली. कोविड महामारीमुळे मागील जत्रोत्सवास येऊ न शकलेल्या भाविकांनी यंदा हजेरी लावून देवीच्या दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला तसेच आपले नवसही फेडले.
शेजारील महाराष्ट्र, कर्नाटक येथूनही आलेल्या भाविकांनी उपस्थिती लावली होती. जत्रेच्या फेरीत फुलविक्रेत्यांनी बऱयाच प्रमाणात हजेरी लावली तसेच मिठाईवाले, चणेवाले व इतर विक्रेत्यांनीही दुकाने थाटली होती. जत्रेच्या काळात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थित सांभाळली. जत्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवीच्या मूर्तीला महारथात स्थानापन्न करण्यात आले व नंतर बँडवादनाच्या तालावर मंदिराच्या सभोवताली भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तितक्मयाच उत्साहात असंख्य भाविक सहभागी झाले.
तत्पूर्वी पहिल्या दिवशी सकाळी श्रींस महाभिषेक, रात्री विधीपूर्वक नमन व शिबिकोत्सव, नंतर श्रींची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक, आतषबाजी, आरती, प्रसाद व नंतर नाटक, दुसऱया दिवशी सकाळी श्रींस महाभिषेक, रात्री शिबिकोत्सव, नंतर श्रींची मयूर रथातून भव्य मिरवणूक, आतषबाजी, आरती, प्रसाद व मॅजिक शो, तिसऱया दिवशी सकाळी श्रींस महाभिषेक, रात्री शिबिकोत्सव, नंतर श्रींची सूर्यरथातून भव्य मिरवणूक, आतषबाजी, आरती, प्रसाद व नंतर कोकणी नाटक, तर चौथ्या दिवशी सकाळी श्रींस महाभिषेक व रात्री ऑर्केस्ट्रा झाला. पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटे श्रींची महारथातून भव्य मिरवणूक, आतषबाजी, आरती, प्रसाद होऊन सांगता झाली. हा जत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष दिलखुश नाईक देसाई, चिटणीस अजय नाईक देसाई, खजिनदार सुजय देसाई व मुखत्यार देवप्पा नाईक देसाई यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, श्रींस अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने, कपडे व इतर वस्तूंचा जाहीर लिलाव 8, 9 व 10 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत केला जाईल, अशी माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे.