क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
बेतीच्या शांतादुर्गा संघाने एमवायएस मडकई संघावर 5 गडय़ांनी विजय मिळवून मडकई युवक संघाने आयोजित केलेल्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुढील फेरीत प्रवेश केला. मडकई पंचायत मैदानावर ही स्पर्धा खेळविण्यात येत आहे.
प्रथम खेळताना एमवायएस संघाने निर्धारीत 20 षटकात 7 बाद 156 धावा केल्या. महेश रायकरने 39, अखिल फडते 24, सर्वन्ना 19 तर उन्मेश खेडेकर व शुभम नाईकने प्रत्येकी 15 धावा केल्या. राजेशने 3, महंक 2 व मनिषने 1 गडी बाद केला. विजयी उद्दिष्टय़ शांतादुर्गा संघाने 5 गडय़ांच्या मोबदल्यात पार केले. धीरज फडतेने 40, जयपाल माडा व रोशनने प्रत्येकी 31, त्रिरॉय कुबल 19 व साईश भोसलेने 12 धावा काढल्या. शुभेंद्रने 2 तर सुजय, सर्वन्ना व साईशने प्रत्येकी 1 गडी बाद केला.