प्रतिनिधी /कुंकळ्ळी
वेरोडा, कुंकळ्ळी येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानात दाखल झालेल्या नवीन महाब्रह्मरथाची भू-स्पर्श पूजा गुरुवार 2 डिसेंबर रोजी सकाळी आयोजित करण्यात आली आहे. हा विधी झाल्यावर देवीच्या वार्षिक उत्सवासाठी महाब्रह्मरथ वापरता येणार आहे. सकाळी देवीला महाअभिषेक, आरत्या व नंतर महाब्ा्रह्म रथाच्या अंतर्गत होणारे धार्मिक हवन व इतर विधी होणार आहेत.
महाब्रह्मरथासंबंधी हे विधी असल्याने सर्व वांगडय़ांमधील एका दांपत्याने 2 रोजी वेळेवर उपस्थित राहावे तसेच आज बुधवार 1 डिसेंबर रोजी त्यांनी पूर्ण शाकाहारी राहावे, अशी सूचना पुजाऱयांच्या वतीने कार्यकारी समितीने केली आहे. यादरम्यान दुपारी आरत्या व नंतर 1.30 वा. महाप्रसाद होईल. सायंकाळी 7 वा. सिद्धनाथ बुयांव, नंदन हेगडे, अंबेश तळावलीकर, धनराज मडकईकर व यतीन तळावलीकर यांचा सहभाग असलेला कोकणी व मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नंतर आरत्या, प्रसाद व 9 वा. महाप्रसाद होईल. तरी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी समितीने केले आहे.