उत्तम आरोग्यासाठी सात ते नऊ तासांची शांत झोप गरजेची आहे. पण रोजची धावपळ, ताणतणाव तसंच इतर कारणांमुळे झोपेचं खोबरं होतं. नीट झोप मिळाली नाही तर चिडचिड, डोकेदुखी अस्वस्थता अशा समस्या निर्माण होतात. निद्रानाश किंवा नैराश्यामुळे झोप येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. पण सदोष जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे झोप येत नसेल तर तुम्ही काही पदार्थांचं सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकते.
- बदामाच्या
सेवनामुळे झोपेचा दर्जा सुधारतो. रात्री झोपण्याआधी किंवा दिवसभरात कधीही थोडे बदाम
खा. बदामांमुळे झोपेशी संबधित हार्मोन्सना चालना मिळते आणि तुम्ही शांत झोपू शकता.
यातल्या
मॅग्नेशियममुळे झोपेचा दर्जा सुधारतो. यातल्या ट्रिप्टोफॅन नामक घटकामुळे मेंदू आणि नसांना आराम मिळतो. - केळ्यातल्या मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे स्नायू मोकळे होतात. झोपेशी संबंधित समस्या असतील तर दररोज एक किंवा दोन केळी खा. यातही ट्रिप्टोफॅन नामक घटक असतो.
- कॅमोमाईल चहा हा सुद्धा चांगला पर्याय आहे. थोडं पाणी गरम करून त्यात कॅमोमाईल चहा घाला आणि प्या. यातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे मेंदूला झोपेचा संदेश जातो आणि शांत झोप लागते. हा चहा पिऊन झोपताना शांत संगीत ऐका. काही मिनिटांमध्ये तुम्ही झोपून जाल.
- हळद आणि केशर घातलेलं दूध प्यायल्यामुळे आराम मिळू शकातो.
- रात्रीच्या जेवणात ओट्स
घेता येतील. यात गुंतागुंतीची
कर्बोदकं असतात. या
कर्बोदकांमुळे तुम्ही झोपेच्या अधीन होता. ओट्स हा
मेलाटोनिनचा नैसर्गिक स्रोत आहे.