सावंतवाडी / प्रतिनिधी-
सावंतवाडी शांत सुसंस्कृत शहरात व्हिडिओ गेम, क्लब, मटका, जुगार हे अवैद्य धंदे सुरू आहेत, यामुळे शहरातील शाळकरी मुले व युवा पिढी बरबाद होत आहे. येत्या 15 दिवसात जर का हे सर्व धंदे बंद करावे, पोलीस विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी कळकळीची विनंती खुद्द नगराध्यक्ष संजू परब यांनी ई-मेल द्वारे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. पंधरा दिवसात हे न थांबल्यास आपण स्वतः जिल्हाधिकार्यालय समोर उपोषण करणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी दिलाय.