मुंबई
चिनी कंपनी शाओमीने भारतात एमआय स्टोअर ऑन व्हिल्सची योजना सुरू केली असून याअंतर्गत ग्राहकांना कंपनीचे स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, सीसीटीव्ही, कॅमेरा अशी विविध उत्पादने खरेदी करता येणार आहेत. शाओमीने याकरीता फिरता ट्रक बनवला असून त्यावर ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. छोटय़ा शहर आणि खेडेगावातही शाओमीच्या उत्पादनांची विक्री करणारा ट्रक फिरणार आहे. यावर नव्याने दाखल होणारे स्मार्टफोन्स तर मिळणार आहेतच शिवाय एमआयचे स्मार्ट टीव्ही, एमआय बॉक्स 4 के, एमआय टीव्ही स्टीक, एमआय सीसीटीव्ही कॅमेरे, एमआय स्पोर्टस् ब्लूटुथ इयरफोन्स, एमआय ट्रु वायरलेस इयरफोन्स, रेडमी इयरबडस्, सनग्लासेस, पॉवरबँक्स आणि चार्जरसारखी उत्पादने खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.