श्रद्धा कपूरचे चाहते तिच्या प्राण्यांबद्दलच्या प्रेमाबद्दल जाणून आहेत. श्रद्धाचे इन्स्टाग्राम पेज प्राण्यांसंबंधीच्या पोस्टने भरलेले आहे. अभिनेत्रीने पुन्हा एकदा स्वतःच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करत स्वतःच्या चाहत्यांना शाकाहारी होण्याचे आवाहन केले आहे. श्रद्धा मागील दोन वर्षांपासून शाकाहारी असून या बदलाने तिच्या जीवनात झालेले बदल तिने मांडले आहेत.
प्राणी आणि आमच्या निसर्गाबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी मी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने मला आनंदी आणि तंदुरुस्त केल्याचे श्रद्धाने म्हटले आहे. या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्रीच्या चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. यात काही कलाकार मित्रमंडळी देखील आहेत. जॅकलीन फर्नांडिस, भूमी पेडणेकर, सिद्धांत कपूर यासारख्या काही लोकांनी श्रद्धांच्या या विचारांचे कौतुक केले आहे. श्रद्धा कपूर यापूर्वी प्राण्यांच्या रक्षणासाठी काम करताना दिसून आली आहे.