मुंबई
शापुरजी पालनजी ग्रुप अंतर्गत कार्यरत असणारी कंपनी स्टर्लिंग ऍण्ड विल्सन सोलार यांना ऑस्ट्रेलियातून दोन मोठय़ा सोलार प्रकल्पांसाठी 1600 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या अंतर्गत कंपनी ऑस्ट्रेलियात 300 मेगा वॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाचे काम लागलीच सुरु करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगून सध्याला 800 मेगावॅट क्षमतेच्या तीन प्रकल्पांचे काम सुरु असल्याचे स्पष्ट केले. कंपनीची ऑस्ट्रेलियातील एकूण ऑर्डर 6 हजार 350 कोटी रुपयांवर पोहचली आहे.