क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
शापोरा प्रीमियर लीग टी-10 क्रिकेट स्पर्धेत जय गणेश वॉरियर्स, आर्मस्ट्राँग युनायटेड व ओशन किंग्स संघानी विजय नोंदिवले. शापोरा पंचायत मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जय गणेश वॉरियर्सने महेश युनायटेडचा 4 विकेट्सनी, आर्मस्ट्राँग अंजुणाने महेश युनायटेडचा 10 विकेट्सनी तर ओशन किंग्सने अंजुणा चॅम्प्सचा 4 धावानी पराभव केला.
संक्षिप्त धावफलकः महेश युनायटेड, 10 षटकात 8 बाद 76 (प्रदोष वाळके 47 धावा. लक्ष्मीकांत साळगावकर 2-18, अश्वेश दाभोळकर, हेमंत पालयेकर व दिप्तेश गावडे प्रत्येकी एक बळी) पराभूत विरूद्ध जय गणेश वॉरियर्स, 9.4 षटकात 6 बाद 77 (लक्ष्मीकांत साळगावकर 15, राघोबा पार्सेकर 35 धावा. समीर हरमलकर 2-11, वॅन्सी सिल्वेरा, कौशिक पेडणेकर व प्रदोष वाळके प्रत्येकी एक बळी). सामनावीर – राघोबा पार्सेकर (जय गणेश वॉरियर्स).
महेश युनायटेड, 10 षटकात 3 बाद 81 (प्रदोष वाळके 15, धीरज पर्येकर 19, कौशिक पेडणेकर 24, वॅन्सी सिल्वेरा नाबाद 16 धावा. अशोक बांदेकर व विक्रांत गावस प्रत्येकी एक बळी) पराभूत विरूद्ध आर्मस्ट्राँग अंजुणा, 6.3 षटकात बिनबाद 83 (व्यंकटेश माईणकर नाबाद 41, शंकर मुळगावकर नाबाद 30 धावा). व्यंकटेश माईणकर (आर्मस्ट्राँग युनायटेड). ओशन किंग्स, 10 षटकात 5 बाद 106 (चेतन सांगेलकर 31, नीलय हळर्णकर 10, मयुर धारगळकर 18 धावा. संतोष कांदोळकर 2-19, रुपेश पोपकर, पांडुरंग सांगेलकर व सावियो पिंटो प्रत्येकी एक बळी) विजयी विरूद्ध अंजुणा चॅम्प्स, 10 षटकात 7 बाद 102 (रुपेश पोपकर 12, अक्षय मांद्रेकर 32, नवनाथ चिमुलकर 34 धावा. धर्मा चोडणकर 3-19, श्रीसागर नाईक, अर्जुन घार्से व विशू धोणे प्रत्येकी एक बळी). धर्मा चोडणकर (ओशन किंग्स).