प्रतिनिधी / बेळगाव
शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे महिला विद्यापीठ, विजापूरच्या माजी उपकुलगुरू डॉ. मीना चंदावरकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. डॉ. मीना चंदावरकर यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत भाग घेतला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक संस्थांची विविध पदे भूषविली आहेत. एक उत्तम प्रशासक व शिक्षणतज्ञ अशी त्यांची ओळख आहे. सध्या त्या 153 शिक्षण संस्थांचा समावेश असलेल्या बागलकोट येथील बी. व्ही. व्ही. संघाच्या प्रमुख सल्लागार आहेत.
हा कार्यक्रम सोमवार दि. 24 मे रोजी दु. 4.30 ते 6 या वेळेत झूमद्वारे घेण्यात येईल. शारदोत्सव समितीच्या अध्यक्षा प्रा. माधुरी शानभाग मुलाखत घेतील. तसेच डॉ. कस्तुरीरंगन कमिटीने सादर केलेल्या नवीन शिक्षण पद्धतीबद्दल व सध्य परिस्थितीत शिक्षणावर होणारा दूरगामी परिणाम या विषयावरही त्या बोलणार आहेत. सहभागी महिला आपले प्रश्न विचारू शकतात.
वरील कार्यक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱया महिलांनी आपली नावे कीर्ती दोड्डण्णावर 9448691833 या क्रमांकावर नावे नोंदवावीत. ज्या महिलांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी निर्मला कळ्ळीमनी 9964759366 यांच्याशी संपर्क साधावा.