प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे व्यवसाय नाहीत, नोकऱया नाहीत. त्यामुळे मुलांची फी भरणे अशक्मय असून पूर्ण फी घेण्याऐवजी अर्धी फी घ्यावी, अशी मागणी पालकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बेन्सन हायस्कूल-यमनापूर या इंग्रजी शाळेमध्ये पूर्ण फी भरा, असा अट्टाहास धरण्यात येत आहे. मात्र ते अशक्मय असून 50 टक्केच फी घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कोरोना जगासमोरील मोठे संकट आहे. या संकटामुळे बेरोजगारी वाढली आहे. जीवन जगणे कठीण असताना विद्यार्थ्यांकडून फी मात्र पूर्ण आकारली जात आहे. गेले वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले नाही. आता केवळ तीन ते चार महिनेच शाळा शिल्लक राहिली आहे. त्यामुळे पूर्ण फी घेणे चुकीचे आहे.
पालकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा शाळेच्या व्यवस्थापनाने याचा विचार करून फी कमी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पालकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.