नोव्हेंबरसह डिसेंबरच्या सिझनवरही पाणी : लाखो रुपयांचा महसूल बुडाला : कोरोना महामारीमुळे उत्पन्नावर परिणाम
प्रतिनिधी / बेळगाव
शाळा बंद राहिल्याने शैक्षणिक अभ्यासक्रमातील सहलींनाही कोरोनाचा ब्रेक लागला आहे. याचा परिणाम थेट परिवहन मंडळाच्या महसुलावर झाला आहे. प्रामुख्याने नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान अनेक शाळांतून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सहलीही थांबल्या आहेत. त्यामुळे परिवहनला शाळांच्या शैक्षणिक सहलींतून मिळणाऱया महसुलावर पाणी फेरावे लागले आहे.
कोरोनामुळे शाळा बंद आहेत शिवाय अभ्यासक्रमातील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱया शैक्षणिक सहलींना विद्यार्थ्यांना मुकावे लागले आहे. सहल ही शैक्षणिक उपक्रम मानला जातो. पर्यटनास्थळासह ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक माहिती मिळवून व त्याचे दर्शन घडावे, या उद्देशाने प्रत्येक शालेय शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. मात्र कोरोनामुळे शाळाच बंद असल्याने सहलींना देखील स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांमध्ये परिवहनच्या उत्पन्नात वाढ व्हायची. मात्र अद्याप शाळाच बंद असल्याने शालेय सहलींतून मिळणाऱया उत्पन्नावर पाणी फिरले आहे. दरवषी डिसेंबर ते जानेवारीपर्यंत शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. दरम्यान परिवहनकडून सरकारी शाळांसाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून दिल्या जातात. डिसेंबर आला की प्रत्येक शाळेतून सहलींच्या आयोजनासाठी लगबग सुरू होते. मात्र कोरोनामुळे शैक्षणिक सहलींना बेक लागल्याने परिवहनचे उत्पन्न बुडाले आहे.
पर्यटनस्थळेही बंद
डिसेंबर व जानेवारी महिन्यात प्रत्येक शाळेतून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जायचे. या सहलींसाठी परिवहन मंडळाच्या बस आरक्षित केल्या जायच्या. मात्र कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शिवाय पर्यटनस्थळे देखील बंद आहेत. त्यामुळे परिवहनला दरवषी वार्षिक सहलींच्या माध्यमातून मिळणाऱया लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. सहलींच्या हंगामामध्ये दररोज 10 ते 15 बसेस विविध पर्यटनस्थळांकडे विद्यार्थ्यांना घेऊन धावायच्या.
सहलींचा फटका
कोरोना संसर्गामुळे सर्व शाळाच बंद
विद्यार्थ्यांना सहलींना मुकावे लागले
पर्यटनस्थळाची माहिती मिळण्यापासून विद्यार्थी वंचित