बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकार ९ ऑगस्टपासून ९ वी आणि त्यापेक्षा वरच्या वर्गासाठी २३ ऑगस्टपासून वेळापत्रकानुसार ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ९ वी वरील विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग सुरु होतील असे म्हंटले आहे.
गेल्या पाच दिवसांमध्ये कोरोना बाधित मुलांच्या संख्येत वाढ झाल्याच्या अहवालानंतर, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश म्हणाले, “आदेश मागे घेण्याचा किंवा निर्णयावर पुनर्विचार करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही सर्व शाळा सुरु करण्यास तयार आहोत. २३ ऑगस्टपासून ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करा, ” असे ते म्हणाले.
मंत्र्यांनी असेही नमूद केले, “चिंता प्राथमिक श्रेणीतील मुलांची आहे आणि आम्ही या महिन्याच्या अखेरीस त्यावर चर्चा करू.” सार्वजनिक सूचना विभागाचे आयुक्त व्ही.अंबू कुमार म्हणाले की, शुक्रवारी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) जारी केली जाईल. सध्याच्या निर्णयानुसार, इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी आणि १२ वी चे वर्ग २३ ऑगस्टपासून ऑफलाइन सुरू होतील.