बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनामुळे देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. दरम्यान कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी मंगळवारी शाळा सुरु करण्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील शाळा व पीयू महाविद्यालये पुन्हा कधी सुरू करायची हे राज्य सरकारने निश्चित केलेले नाही. शाळा, महाविद्यालये पुन्हा उघडण्याची कोणतीही योजना नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व आमदार, शिक्षक, शाळा व्यवस्थापन, पालक, शिक्षक आणि यंत्रणेच्या इतर भागधारकांच्या सर्व सूचना व माहितीचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल असे मंत्री सुरेश यांनी सांगितले.
मंत्री सुरेश यांनी बेंगळूला परतल्यानंतर तज्ञांची आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले.