बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले की, शाळा पुन्हा सुरु करायच्या झाल्यास सरकारी व खासगी शाळांमधील शिक्षकांना कोरोना लसीकरण केले जाईल जेणेकरुन मुलांना प्राध्यापकांकडून होणार संसर्ग टाळला जाईल आणि शाळा पुन्हा सुरू करता येतील. तसेच राज्य सरकार टप्प्याटप्प्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून वर्ग पुन्हा सुरू करणार आहे, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्री-नियुक्त तज्ञ ’समिती’ याविषयी अहवाल देणार आहे.
दरम्यान, मंत्री सुधाकर यांनी राज्य सरकारला लवकरात लवकर शाळा पुन्हा सुरू करायच्या आहेत. “मुलांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून लवकरात लवकर शाळा सुरू करण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना प्राधान्याने कोरोनाची लस दिली जाईल,” असे मंत्री म्हणाले.
ऑनलाईन वर्ग सुरू असले तरी कोरोनाची भीती पाहता या शैक्षणिक वर्षात शाळा बंद ठेवण्यात आल्या. कोरोनाची तृतीय लाट उद्भवल्यास आणि मुलांना संसर्ग होऊ नये यासाठी सरकारने प्रौढांना लसीकरण अधिक केले, यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे.