अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 19 जानेवारी 2022, सकाळी 11.00
● रूग्ण संख्या कमी असलेल्या भागात घंटा वाजणार
● रूग्णसंख्या दीड हजारांकडे
● 24 तासात वाढले 1436 रूग्ण
● पॉझिटिव्हीटी रेट 33.33 वर
●5189 संशयितांच्या चाचण्या
●सातारा 405 तर कराड 313
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढ होत असली तरी सौम्य लक्षणांमुळे रूग्ण अवघ्या चार ते पाच दिवसात बरे होत आहेत. परिणामी कोरोना रूग्णवाढीची भिती फारशी उरलेली नाही. त्यामुळे राज्यात 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असलेल्या शाळा सुरू करण्यावर उद्या (गुरूवारी) निर्णय शक्य आहे. यामधे सातारा जिल्ह्यातील कोणकोणत्या भागातील शाळा सुरू होतात याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात गेल्या 24 तासात 1436 कोरोना रूग्ण वाढले असून पॉझिटिव्हीटी रेट 33.33 वर पोहचला आहे.
पॉझिटिव्हीटी रेट 33.33 वर
जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1436 रूग्ण वाढले आहेत. सातारा तालुक्यात सर्वाधिक 405 रूग्ण तर कराड तालुक्यात 313 रूग्ण वाढले आहेत. फलटण तालुक्यात 164 रूग्ण वाढले आहेत. जावलीत 20, खंंडाळा 81, खटाव 92, कोरेगांव 70, माण 72, महाबळेश्वर 35, पाटण 61, वाई तालुक्यात 96 रूग्ण वाढले आहेत.
रूग्णसंख्येचा विचार होणार
राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय होताना ग्रामिण भागाला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात सातारा, कराड या तालुक्यात रूग्णवाढीचा वेग जास्त आहे. उर्वरीत तालुक्यात रूग्णसंख्या कमी जास्त होत असून अनेक गावात एकही रूग्ण नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही शाळा सुरू करताना रूग्णसंख्येचा विचार करून निर्णय होण्याची शक्यता आहे. पालकांचे या निर्णयाकडे लक्ष आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने विद्यार्थी पालकांच्यात पुन्हा एकदा अस्वस्थता आहे.
मंगळवारी
नमुने-5189
बाधित-1436
मुक्त-89
मृत्यू-1
उपचारार्थ-5283
मंगळवारपर्यंत
नमुने-24,35,848
बाधित-2,60,175
मुक्त-2,46,557
मृत्यू-6,513