5 वर्षीय मुलाची आईकडे केली तक्रार
मुल मोठे होऊ लागल्यावर लिहायला-वाचायला हळूहळू शिकू लागते. प्रत्येक आईवडिलासाठी स्वतःचे मूल पहिल्यांदा बोलते, पहिल्यांदा चालते, पहिल्यांदा लिहू लागते, तो क्षण अत्यंत आनंदाचा असतो. परंतु एका मुलाने जीवनात पहिल्यांदाच लिहिलेले वाक्य पाहून त्याच्या शिक्षकाने त्याच्या आईकडेच तक्रार केली आहे.
इंग्लंडच्या सोमरसेटमध्ये राहणाऱया 39 वर्षीय क्रिस्टी जॉर्डन स्मिथचा 5 वर्षीय मुलगा फिनलेने अलिकडेच शाळेत जाण्यास सुरुवात केली आहे, शाळेत त्याने लिहिण्याचा सराव देखील सुरू केला. पण फिनलेने जीवनातील पहिले वाक्य लिहिलेले पाहून शिक्षक दंगच झाला. या शिक्षकाने त्वरित त्याच्या आईला बोलावून घेत त्याने लिहिलेले वाक्य वाचून दाखविले. ते ऐकल्यावर क्रिस्टी देखील हैराण झाल्या, परंतु त्यांचे हसून हसून पोट दुखू लागले.
पालक-शिक्षक बैठकीच्या दिवशी मुलाच्या शिक्षकाने येण्यास सांगितले. माझ्या खोडकर मुलाने काही तरी खोड काढली असेल म्हणून बोलाविल्याचे वाटले. परंतु वर्गात पोहोचल्यावर शिक्षकाने एका कोपऱयात नेत टॅबवर मुलाच्या पहिल्या वाक्याचे छायाचित्र दाखविले. ‘यात ‘मला मद्य पसंत आहे’ (आय लाइक वाईन) असे लिहिलेले होते असे क्रिस्टी यांनी सांगितले आहे.
मुलाला माहिती नव्हता अर्थ घरी पोहोचल्यावर क्रिस्टी यांनी मुलाला वाईन काय असते असे विचारले. यावर मुलाने माहित नसल्याचे उत्तर दिले. मी तसेच माझा पती घरात दररोज मद्यप्राशन करत नाहीत. यामुळे मुलाने घरी मद्याच्या बाटल्या किंवा त्यांचे लेबल पाहिले असण्याची शक्यता कमी आहे. फिनलेला वाइनचा अर्थ मद्य असल्याचे सांगितल्यावर