आबलोली-वार्ताहर
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर कोरोना चाचणी केलेले काही व्यापारी कोरोना पा?झिटीव्ह आले. मात्र त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने त्यातील काहीजणांनी डेरवण रुग्णालयात जाऊन पुन्हा आपली खासगी आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. मात्र यामध्ये ते निगेटिव्ह आले. कोरोना अहवालातील फरकांमुळे आबलोली परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने जाहीर केलेल्या ला?कडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास नियमांच्या चौकटीत राहून परवानगी देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱया आस्थापनांचे मालक, कर्मचारी यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. त्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱया आस्थापनांचे मालक, कर्मचारी यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ग्रामकृती दल, प्रशासन यांच्यावतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत गुहागर तालुक्यातील आबलोली येथील व्यापारी, कर्मचारी बांधवांनी आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी आरटीपीसीआरसाठी आपले स्व?ब दिले. त्याच्या अहवालात काही व्यापारी कोरोना पा?झिटीव्ह आले. परिणामी तातडीने आबलोली बाजारपेठ सोमवारपर्यंत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र कोरोना पा?झिटिव्ह आलेल्या व्यापाऱयांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने त्यातील काहीजणांनी डेरवण रुग्णालयात जाऊन पुन्हा आपली खासगी कोरोना चाचणी आरटीपीसीआर करून घेतली. त्यामध्ये या सर्व व्यापाऱयांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. सध्या हे व्यापारी गृह विलगीकरणात आहेत. कोरोना अहवालातील फरकांमुळे आबलोली परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून कोणता अहवाल खरा मानावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे