देशातील अनेक कार्यालये बंद आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये कमी संख्येत कर्मचारी वर्ग उपस्थित राहतोय. केवळ अत्यावश्यक सेवांचे विभाग सुरूआहेत. अनेक खासगी कार्यालयांमध्ये सध्या वर्क फ्रॉम होम म्हणजेच कर्मचारी घरातूनच काम केले जात आहे. याचदरम्यान शासकीय कर्मचाऱयांसाठी खूषखबर समोर आली आहे. सरकार कर्मचाऱयांकडून घरातूनच काम करविण्याच्या पर्यायावर विचार करत आहे.
15 दिवस वर्क फ्रॉम होम
सरकारने वर्क फ्रॉम होमसंबंधी एक मसुदा अहवाल तयार केला आहे. यानुसार शासकीय कर्मचाऱयांना वर्षात 15 दिवसात घरातून काम करण्याची सूट मिळू शकते. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे लागणार आहे, याकरता कामकाजाच्या वेळापत्रकात अनेक बदल करावे लागणार असल्याचे अहवालात नमूद आहे.
21 मेपर्यंत मागविल्या सूचना
मसुदा प्रस्तावात डाटा, डेस्कटॉप आणि लॅपटॉपच्या रिम्बर्समेंटवरही विचार करण्यात आला आहे. घरातून काम करणाऱया कर्मचाऱयांना फोनवर उपलब्ध रहावे लागणार आहे. याचबरोबर मसुदय़ात नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरला कुठल्याही कर्मचाऱयाच्या उपकरणात बिघाड होऊ नये याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच एनआयसी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सेवा उपलब्ध करणार आहे. 21 मेपर्यंत सर्व विभागांना मसुदा प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे.