प्रतिनिधी / शाहुवाडी
शाहूवाडी पोलीस ठाण्यासह ग्रामीण रुग्णालयात शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्मचारी वर्गाची उद्धट वर्तन केल्याप्रकरणी त्याचबरोबर शासकीय वस्तूचे नुकसान केले बाबत आलम शब्बीर शेख राहणार .टेकोली पैकी बाणदारवाडी सध्या राहणार मुंब्रा मुंबई व बैथुल अब्दुल रहीमान शेख रा जरीमरी बाबामिया चाळ इंदीरा नगर मुंबई या दोघांविरोधात शाहुवाडी पोलीसांत पो हे कॉ संभाजी पाटील यांनी फिर्याद दिली असून गुन्हा नोंद झाला आहे.
पोलीसातून मिळालेल्या माहिती नुसार आलम शेख व बैथुल शेख या दोघांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात नशेत येऊन ठाणे अंमलदाराशी उदट वर्तन करून तेथील लोखंडी रॉडवर डोके आपटून शिवीगाळ त्यांना शिवीगाळ करणे, त्या बरोबरच ग्रामीण रूग्णालय मलकापूर येथील आयसीयू मशीन फोडून 27 हजार रूपयाचे नुकसान केले आहे. या नुसार शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.