आर्थिक विस्कटलेली घडी सावरण्यासाठी महामंडळाकडून जिल्हय़ात सर्व्हे सुरू
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोनामुळे एसटीची आर्थिक घडी विस्कटली यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाने पर्याय काढत माल वाहतूक सुरू केली, आा त्यापुढे शासकीय वाहनांची दुरुस्ती एसटीच्या वर्कशॉपमध्ये होणार आहे. याबाबत अद्यापही कामकाज सुरू करण्यात आले नाही मात्र त्यासाठी कार्यप्रणाली सुरू करण्यात आल्याची माहिती प्रभारी विभाग नियंत्रक अनिल मेहत्तर यांनी दिली.
तसेच गरजेनुसार एसटीचे चालक शासकीय वाहने चालविण्यासाठी उपलब्ध करून देण्याची महामंडळाने तयारी केली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिह्यांचा सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले असून, तसा अहवाल महामंडळाला दिला जाईल. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकायांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पाटबंधारे, कृषी विभाग अशा सर्व शासकीय कार्यालयातील वाहनांच्या देखभालीची जबाबदारी घेण्याची तयारी सुरू केली आहे.
त्यानुसार शासकीय वाहनांचा सर्व्हे सुरू झाला आहे. शासकीय कार्यालयांना भेटी देऊन त्यांची वाहने कोणत्या कंपनीची आहेत, दुरुस्तीवर होणारा खर्च किती असेल यासह विविध बाबींचा सर्व्हे दहा दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. तो अहवाल महामंडळाला पाठविला जाईल, त्यानंतर यावर निर्णय होईल अशी माहिती वाहतूक अधिकारी अनिल मेहत्तर यांनी दिली.