जिह्यातील तिसरा तर बेळगावातील पहिला बळी
प्रतिनिधी \बेळगाव
शास्त्रीनगर येथील एका कोरोनाग्रस्त वृध्दाचा बुधवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीला जिह्यात आतापर्यंत तिघा जणांचा मृत्यू झाला असून बेळगाव शहरातील हा पहिला बळी आहे.
शास्त्रीनगर येथील 74 वषीय वृध्दाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मंगळवारी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी या वृध्दाचा मृत्यू झाला. या वृध्दाच्या थेट संपर्कातील 9 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.