मुंबई/प्रतिनिधी
शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खानच्या जामिनावर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये (arthur road jail) आहे. या क्रूझवर छापा टाकल्यानंतर त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. यावर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळले आहेत. दरम्यान, न्यायालयाने जमीन नाकारल्यानंतर शाहरुख खान आज आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात पोहोचला.
दरम्यान, बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान आर्यन खानच्या (aryan khan) वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यादरम्यान आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता.