अभिनेता आयपीएल सामने पाहण्यात व्यस्त, मीराने अनोख्या प्रकारे दाखविले क्रिकेटप्रेम
क्रिकेटचे सर्व चाहते सध्या आयपीएल 2021 सामन्यांचा आनंद घेत आहेत. कोविड-19 महामारीदरम्यान लोक सध्या अधिकाधिक वेळ घरातच घालवत आहेत. अशा स्थितीत क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर देखील अशाच लोकांपैकी एक आहे. शाहिद क्रिकेटचा प्रेमी असून आगामी चित्रपट जर्सीमध्ये तो एका क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे. पण त्याची पत्नी मीरा राजपूतने क्रिकेटबद्दलचे प्रेम अनोख्या प्रकारे व्यक्त केले आहे.
मीराने इन्स्टाग्रामवर कुणी चाहत्याने पाठविलेलया फोटो कोलाज शेअर केले आहे. मीरा राजपूर या छायाचित्रांमध्ये विविध पोशाखात दिसून येते. या फोटोंवर आयपीएल संघाची शॉर्टकट नावे लिहिली आहेत. या फोटोला शेअर करत मीराने ‘जेव्हा माझे पती आयपीएल 20 पाहत आहेत… आणि मी’ अशी कॅप्शन जोडली आहे.