ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभेची निवडणुक अवघ्या काही दिवसांनंतर येऊन ठेपली आहे. त्याआधी आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये शाब्दकि चकमक सुरू आहे. भाजपचे अनेक नेते वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव तरुन चुघ यांनी शाहीन बागची तुलना दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटसोबत केली आहे.
आता तरुन चुघ यांनी ट्विट करून शाहीन बागवर वादग्रस्त विधान केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, शाहीन बाग म्हणजेच शैतान बाग आहे.
ते म्हणतात, आम्ही देशद्रोह्यांना चुकीचे काम करू देणार नाही. भारताच्या अखंडतेला कोणालाही तोडू देणार नाही. शाहीन बागचा अर्थ हा शैतान बाग असा होता. भारतात हाफिज सईदच्या विचारांना या ठिकाणी थारा लागू देणार नाही असंही ते म्हणाले.