आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे हे सर्वस्वी सर्वसामान्य जनतेच्या हातात असून शिहूपुरीवासियांनी याबाबतची योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी येथील लसीकरण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित नागरिकास केले.
यावेळी, कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहता, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, हिंदवी पब्लिक स्कूलचे संस्थापक अमित कुलकर्णी, शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, ग्रा.पं.सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभाताई राजेंद्र केंडे, निलमताई देशमुख, माधवीताई शेटे, डी. वाय. देसाई, नाना कुलकर्णी, तुषार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या लसीकरण मोहिमेचा 18 वर्षांवरील 300 नागरिकांनी लाभ घेतला. तसेच, काल रात्री 12 वाजलेपासूनच नागरिकांनी लावलेल्या रांगा व शाहूपुरी भाग मोठा असल्याने नागरिकांची मागणी लक्षात घेऊन याच धर्तीवर दि. 4 रोजी हिंदवी पब्लिक स्कूल मध्येच सकाळी 10 वाजलेपासून कोवॉक्सिन लसीकरणाच्या पहिल्या व दुसऱया डोससाठीचे आयोजन कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली.
ही लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कण्हेर प्रा. आ. केंद्राच्या डॉ. सौ. कुलकर्णी-तडसरे, श्रीम. कणसे व त्यांचा सर्व सहकारी कर्मचारी, प्रा. डॉ. सुजीत जाधव, राजेंद्र केंडे, हणमंतराव पालेकर, विकास देशमुख, अमर इंदलकर, निखिल भोसले, राजाराम शेलार, आप्पा औताडे, सुरेश शेटे, नितीन तरडे, महेश जांभळे, ओम ग्रुपचे विश्वजीत बालगुडे, गणेश वाघमारे, ऍड. योगेश साळुंखे, कट्टा ग्रुपचे संकेत परामणे, सौरभ पाटणे, अजय भोसले, विजयेंद्र देसाई, निशांत केंडे, सोहम जोशी, सरकार ग्रुपचे अनिकेत जगताप, सुमित शेटे, रोहित जाधव, रमेश इंदलकर, ऋषिकेश जांभळे, शाहूपुरी गणेशोत्सव मंडळाचे प्रसन्न मदने, मयूर महापार्ले, बलंग, चेतन खराडे, अतुल शिंदे व हिंदवी पब्लिक स्कूलच्या सर्व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.