प्रतिनिधी / सातारा
पालिकेच्या समोरच असलेल्या शाहु चौक ते रविवार पेठ पोलीस चौकी या दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम आज सकाळपासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. पोलीस वसाहतीच्या मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी होत होती.