प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील शाहूनगर परिसरातील जाधव कॉलनी टेरेसवरील लोखंडी ग्रीलचा दरवाजा उघडून घरात प्रवेश अज्ञात चोरटय़ाने रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 59 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. 9 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे.
याबाबत उमा राहूल धायगुडे (वय 40, रा. जाधव कॉलनी, शाहूनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या बंगल्याच्या टेरेसवरील लोखंडी ग्रीलचा दरवाजा तोडून रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञात चोरटय़ाने प्रवेश केला. यावेळी चोरटय़ाने त्यांच्या बेडरुममधील रोख रक्कम व सोन्याचे कानातील टॉप ठेवलेली पर्स असा एकूण 59 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरटय़ावर गुन्हा दाखल केला असून या चोरीचा पुढील तपास पोलीस नाईक पी. एस. जंगम करत आहेत.