ग्रा. पं. बैठकीत ठराव ः शेतकऱयांशी चर्चा करणार
कंग्राळी बुद्रुक
शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुक गावापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे 60 फूट रुंदीकरण करण्याचा निर्णय ग्रा. पं. मध्ये बोलाविलेल्या बैठकीमध्ये नुकताच घेण्यात आला. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सध्या असलेल्या रस्त्याच्या मध्यभागापासून पूर्व दिशेला 30 फूट व पश्चिम दिशेला 30 फूट असा एकूण 60 फुटांचा रस्ता करणार असल्याबद्दल बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
मंगळवार दि. 12 रोजी सकाळी 10 वाजता रस्ता रुंदीकरण संदर्भात जागेवरच शेतकऱयांबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. तेव्हा ज्या शेतकऱयांची रस्ता रुंदीकरणामध्ये जमीन जाणार आहे त्या सर्व शेतकऱयांनी शेतातील जागेवर उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रा. पं. अध्यक्ष संध्या चौगुले, उपाध्यक्ष अनिल पावशे व सदस्यांनी केले आहे.