एका आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश
प्रतिनिधी / सातारा
शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून बेकायदा देशी-विदेशी दारूची मोटार सायकलवरून वाहतूक करणाऱया तानाजी कृष्णाजी किर्दत (वय 58, रा. करंजे पेठ सातारा) यांचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 54 हजार 860 रूपये किंमतीची देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना बुधवारनाका ते बाबर कॉलनी, करंजे रस्त्याने तानाजी कृष्णाजी किर्दत हा मोटारसायकलवरून बेकायदेशीर देशी-विदेशी दारूची वाहतूक करणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. यानुसार शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार करून छापा टाकून करवाईचे आदेश देण्यात आले. या पथकाने बुधवारनाका ते बाबर कॉलनी, करंजे रोडने विसर्जन तळ्याजवळ सापळा लावला. यावेळी 12.45 च्या सुमारास तानाजी किर्दत पांढऱया रंगाच्या ऍक्टीव्हा मोटारसायकलवरून खाकी रंगाचे पोत्यामध्ये काहीतरी घेऊन येताना दिसला. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याला थांबण्याचा इशारा केला. तरीही तो न थांबता तसाच पुढे जावू लागला. यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील खाकी पोत्याची तपासणी केली. त्यामध्ये 14 हजार 860 रूपये किंमतीची विदेशी दारू मॅकडॉनल नंबर 1 विस्की, विदेशी दारू इंम्पेरियल ब्लु, देशी दारू मनोरंजन संत्रा, टॅगो, पंच अशा देशी-विदेशी दारूच्या एकूण 316 क्वार्टर व मोटारसायकल असा एकूण 54 हजार 860 रूपये किंमतीचा प्रोव्ही माल मिळून आला. या कारवाईत पालीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, ओंकार यादव, पोलीस कॉन्टेबल सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी सहभाग घेतला.