प्रतिनिधी / शाहुवाडी
लॉकडाऊन कालावधीत सात ते अकरा वेळेनंतरही दुकान चालू ठेवल्याबाबत येळाणे येथील दोन आस्थापनासह मलकापूर शहरातील एक कृषी सेवा केंद्रांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर येळाने येथील मटण दुकान लॉकडाऊन उठेपर्यंत कायमस्वरूपी सील करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली. प्रांताधिकारी अमित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत सकाळी सात ते अकरा या वेळेतच आस्थापने सुरू ठेवायचे आहेत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापनांना अकरानंतर उघडण्यास प्रतिबंध आहे तरीदेखील शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील दोन अस्थापने व मलकापूर येथील कृषी सेवा केंद्र यांच्यावर प्रांताधिकारी अमित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली तर येळाणे येथील एक मटन दुकान लॉकडाऊन संपेपर्यंत सील करण्यात आले आहे.
मलकापूर शहरात सात ते अकरा या वेळेत गर्दी वाढतच आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊन देखील गर्दीचे प्रमाण कमी होत नाही या गर्दीला रोखण्यासाठी प्रभावी कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अमित माळी यांच्यासह तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या पथकाने येळाने मलकापूर शहरात भेट देऊन 11 नंतर सुरू असलेल्या अस्थापना वर कारवाई केली
दरम्यान यापुढेही सात ते अकरा या वेळे नंतर अस्थापना सुरू राहिल्यास अथवा गर्दी राहिल्यास संबंधितांच्या वर कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी अमित माळी यांनी दिला आहे. तर शहरातील व्यापारी वर्गाने ही कडक बंधन पाळून 11 नंतर अस्थापना सुरू राहणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी अन्यथा कारवाई क