प्रतिनिधी / शाहुवाडी
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या ठरलेल्या शाहूवाडी तालुक्यात आज अखेर.१०६ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिसचार्ज देण्यात आले असून आता केवळ ६३ कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी एच आर निरंकारी यांनी दिली.
पुणे, मुबंई व बाधीत भागातून सुमारे सहा हजार चाकरमाणी शाहूवाडीत आले आहेत. गेली तीन आठवडे नियमित रूग्णांच्या संख्येत वाढ होत होती. जिल्हाच्या एकूण रूग्णां पेकी सुमारे तेहतीस टक्के रूग्ण हे शाहूवाडीत आढळत होते.,आज अखेर १७० कोरोनाबाधीत रूग्ण आढळले यापैकी १०६ रूग्ण कोरोनामुक्त झाले. पेरिड येथील कोविड सेंटरमधून आज अखेर ६२ व सीपीआर रूग्णालयातून ४४ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चाँर्ज देण्यात आला आहे.आता केवळ ६३ रूग्ण पेरिड, जयसिंगपूर व सीपीआर रूग्णालय कोल्हापूर येथे उपचार घेत आहेत.१७० रूग्णांपैकी कडवे पैकी लाळेवाडी येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे बळी गेला आहे.तालुका डोंगराळ, दुर्गम व अपुरी वैदयकीय कुमक असताना देखील तालुका आरोग्य, महसूल ,पोलिस यंत्रणेतील ने संघटितपणे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे तालुका लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे.