प्रतिनिधी / शाहुवाडी
कोरोनाचा
वाढता प्रसार रोखण्यासाठी
नागरिकांनी घरातून बाहेर पडू
नये यासाठी प्रभावी अंमलबजावणी
सुरू आहे. त्याच
पार्श्वभूमीवर विनाकारण
रस्त्यावर येणाऱ्या वाहनधारकांवर
आता शाहूवाडी पोलिसांनी
कारवाईची मोहीम उघडली असून
मलकापूर प्रवेश द्वारावरच
वाहनधारकांच्यावर नाकाबंदी
करून कारवाई सुरू केली आहे.
विनंती, सूचना
करून ही टू व्हीलर धारक रस्त्यावर
येत आहेत आता शाहुवाडी पोलिसांनी
कारवाईचा बडगा उगारल्याने
विनाकारण रस्त्यावर येत
असलेल्यांना आता चांगलाच
लगाम बसणार आहे शाहुवाडी पोलीस
ठाण्याचे सहाय्यक पोलीस
निरीक्षक. भालचंद्र
देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक पी. एम.
सराटे यांच्यासह पोलिस
पथकांनी ही कारवाई केली.