शाहुवाडी/प्रतिनिधी
कोरोनाच्या आक्रमणाला रोखण्यासाठी शाहूवाडी तालुक्यात प्रवेश द्वारावर शिराळा हुन येणाऱ्या कोकरूड पुल व सागाव सरूड पुल या ठिकाणी असलेली सीमा बंदी उठणार कधी “गावात गर्दी मात्र सीमेवर बंदी” अशी अवस्था झाली असून सर्वत्र ऑनलॉक होत असताना या दोन्ही सीमा मात्र लॉक डाऊनच असल्याने नागरीकांमध्ये कमालीचा संताप उमटत आहे.
गेल्या सहा महिन्यापासून कोरोना चा वाढत्या प्रसाराने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गर्दी होऊ नये सामाजिक अंतर पाळले जावेत यासाठी गावोगावच्या सीमाही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र काही ठिकाणी सवलत देऊन या सीमा वरील तटबंदी काढलेली आहे. पण गेल्या सहा महिन्यापासून शाहुवाडी आणि शिराळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या गावांची तटबंदी मात्र कायम राहिल्याने सर्वत्र शिथीलता मात्र इथेच तटबंदी का असा प्रश्न नागरिकांतून पुढे येऊ लागला आहे.
गावात गर्दी सीमेवर बंदी
शाहूवाडी तालुक्यात असलेल्या मलकापूर, बांबवडे, सरूड या प्रमुख गावात नेहमीच परिसरातील नागरिकांचा राबता असल्याने गर्दीचे प्रमाण वाढत आहे. मात्र तालुक्याच्या सीमेलगत असणाऱ्या शिराळा तालुक्यात काही ठिकाणी अनेक वेळा नागरिकांना कामाच्या तसेच व्यवसायाच्या निमित्ताने जाणं गरजेचं आहे मात्र गावात गर्दी आणि सीमेवर बंदी या उक्तीचा प्रत्यय नागरिकांना येऊ लागल्याने नागरिकांच्यात ही उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
गाडी अलीकडे कामाला पलीकडे
शाहूवाडी तालुक्यातील काही कर्मचारी विश्वास साखर कारखान्यात कामाला आहेत, तर शिराळा तालुक्यातील काही कर्मचारी उदय सहकारी साखर कारखान्यात ही कामाला आहेत. याबरोबरच अन्य क्षेत्रातही कर्मचारी वर्ग आहे. मात्र गाडी लावा अलीकडे कामाला जावा पलीकडे याप्रमाणे सर्व पुलाच्या अलीकडे वाहनतळ निर्माण होत आहे. नागरिकांच्या पेक्षा गाड्यांची गर्दी जास्तच असल्याचं अनेक वेळा दिसत आहे. महत्त्वाच्या कामावेळी अनेक ठिकाणी या अडचणी निर्माण होत आहेत. तर नातेवाईकांनाही दुरुनच भेट घेण्याची वेळ आल्याने आता तरी सीमा बंदी हटवावे अशी मागणी होऊ लागली आहे.
एकूणच शाहूवाडी तालुक्यातील प्रवेशद्वारावर व कोकरूड पूल व सागाव सरुड येथील पुलावर असणारी प्रवेश बंदी शिथील करून गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेल्या मार्गावर शासनाच्या नियमाचं पालन करून तरी किमान परवानगी द्यावी अशी मागणीही नागरिकांच्यातून पुढे येऊ लागली आहे.