ऑनलाईन टीम / शिकागो :
अमेरिकेच्या शिकागो शहरातील ग्रेशम येथे एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार केला. यात 14 जण जखमी झाले असून, 11 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिकागो शहरातील ग्रेशम येथे तेथील स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सायंकाळी एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यावेळी तिथे कारमधून आलेल्या अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 14 जण जखमी झाले आहेत. त्यामधील 11 जणांना रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आले आहे. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.