ऑनलाईन टीम / शिकागो :
अमेरिकेच्या शिकागो शहरात एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करत तिघांचा बळी घेतला आहे. तर चौघांना जखमी केले आहे. शिकागोमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी डेव्हीड ब्राऊन यांनी तेथील स्थानिक माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली.
जेसन नाइटेंगल (वय 32) असे तिघांची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. जेसनने शनिवारी दुपारी शिकागो युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या 30 वर्षीय विद्यार्थ्यांच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केली. त्यानंतर एका अपार्टमेंटचा 46 वर्षीय गार्ड आणि एका 77 वर्षीय वृद्ध महिलेला संपविले.
दरम्यान, त्याने एका व्यक्तीची कार चोरली. कारने तो एका स्टोअरमध्ये गेला. तिथेही त्याने अंदाधुंद गोळीबार केला. त्यात 20 वर्षीय मुलगा आणि 81 वर्षीय वृद्ध महिलेसह 4 जण जखमी झाले.